Ad will apear here
Next
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगामासाठी धनादेश वाटप
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगामासाठी धनादेश वाटप  करण्यात आले.
परळी वैजनाथ (बीड) : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याशी करार केलेले ऊसतोड कामगार, वाहतूक ठेकेदार यांना २८ जून रोजी एका कार्यक्रमात गळीत हंगाम २०१७-१८साठी पहिल्या हप्त्याचे धनादेश वाटप करण्यात आले.

‘या वर्षीच्या गळीत हंगामात वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पाच लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार आहे. यासाठी ऊसतोड मजूर, वाहतूक ठेकेदार आणि सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘वैद्यनाथला येत्या काही वर्षांत गतवैभव प्राप्त करून आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, वाहतूक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य करावे. गोपीनाथराव मुंडे  यांनी शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी हा

कारखाना उभा केला आहे. गत वर्षी कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. एक वर्षाचा हा काळ अतिशय वेदनादायी होता. या वर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून सहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने ठरवले आहे. यासाठी परिसरासह बाहेरच्या जिल्ह्यातूनही ऊस आणला जाणार आहे. कारखाना ही कामधेनू आहे. तिला जपण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखन्याचे संचालक आमदार आर. टी. देशमुख होते. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, संचालक ज्ञानोबा मुंडे, पांडुरंगराव फड, माधवराव मुंडे, कार्यकारी संचालक व्ही. जी. दगडे आदींसह सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व ऊसतोड मजूर, वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZRPBE
Similar Posts
पंकजा मुंडेंचे ‘रस्त्याच्या भुसंपादन’बाबत निर्देश बीड : येथील बिंदुसरा नदीवरील पूल आणि परळी बाह्य रस्त्याच्या भुसंपादनाबाबत चर्चा करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांच्याशी संपर्क साधला. या वेळी त्यांनी माहिती घेऊन रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.
पंकजा मुंडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे लोकार्पण परळी   (बीड) : येथील रेवली परिसरातील रणजी क्रिकेटपटू भूषण भीमा नावंदे यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी खेळपट्टी (पिच) तयार केली आहे, खेळपट्टीचे लोकार्पण एक जुलै रोजी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.  या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भारताची आणि मुंबईची सलामीवीर स्मृती मंथाना सध्या
परळीच्या कार्यालयात पंकजा मुंडे यांच्या हस्ते आरती बीड : परळीच्या कार्यालयात पंकजा मुंडे यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. संपादक मोहनलाल बियाणी, माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांनी स्वागत केले.
पंकजा मुंडे यांनी परळी येथे घेतले वैजनाथाचे दर्शन परळी (बीड) : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी परळी येथे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथाचे दर्शन घेतले. मराठवाडा आणि बीड जिल्ह्यावर अपुऱ्या पावसामुळे आलेले संकट दूर होऊ दे, भरपूर पाऊस

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language